शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने ठाणे शहरातील पत्रकार व पोलीसांना कोरोना सुरक्षा किटचे वाटप

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने ठाणे शहरातील पत्रकार व पोलीसांना कोरोना सुरक्षा किटचे वाटप



ठाणे 


 शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने ठाणे शहरातील पत्रकार व पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी 4 मास्क आणि 2 सॅनिटायझर बॉटल अशा स्वरूपात किट वाटप. गेल्या 2 दिवसांत एकूण 2 हजार कोरोना सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले आहे. देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशभरातील जनता घरातील बंदिवासात आहे. त्यात, सरकारने आणि आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालनही करण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्य सेवा म्हणून पोलीस,आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि पत्रकार न थकता ऑन ड्युटी २४ तास दिसून येत आहेत. पोलीसबांधव, पत्रकार मित्र आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत,


रोना सुरक्षा किट हे अत्यावश्य सेवा देणाऱ्या पोलीस, पत्रकार आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच प्रामुख्याने देण्यात आले. पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत, प्रसंगी नागरिकांचा मनस्ताप सहन करतात. तर, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारीही दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. पत्रकार मित्रही आपलं कर्तव्य बजावताना या टोकाकडून त्या टोकाकडे धाव घेताना दिसत आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून नेहमीच गरजू रुग्णांना आणि गरिबांना मदतीचा आधार मिळतो. .