कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेल्या नवी मुंबईतील कॉलसेंटरचे ठाण्यात बस्तान

ठाणे :


कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेल्या नवी मुंबईतील कॉलसेंटरचे ठाण्यात बस्तान


स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनीदेखील  प्रकरण गांभीर्याने घेतले



ठाणे


नवी मुंबईतील त्या कॉल सेंटरच्या मालकाने ते बंद न करता ठाण्यात व्यवसाय सुरु केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कॉलसेंटरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शासनाने ते बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या कॉलसेंटरमधील सुमारे ४०० पेक्षा अधिक कर्मचारी ठाण्यात आणून पुन्हा व्यवसाय सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ठाणे पालिकेने हा प्रकार उघडकीस आणून मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.


ठाण्यातील ढोकाळी येथे ज्या इमारतीमध्ये या ४०० कर्मचाऱ्यांना आणले होते, तेथे त्यांना बंदिस्त करून त्यांची तपासणी केली. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. तपासणी केल्याशिवाय एकही कर्मचा याला या इमारतीच्या बाहेर जाऊ दिलेले नाही. ऐरोली येथील कॉल सेंटरच्या एका कर्मचा याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानंतर, या कंपनीने ऐरोली येथील सेंटर बंद करून येथील ४०० कर्मचाऱ्यांना ठाण्यातील ढोकाळी परिसरात शरदचंद्र पवार मिनी स्टेडियमच्या बाजूला इमारतीमध्ये स्थलांतरित केले. हे समजताच जिल्हाधिकारी महापालिका प्रशासनाला अॅलर्ट केले.


त्यानंतर, गुरुवारी रात्री ११.३०च्या दरम्यान स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनीदेखील हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्या ठिकाणी धाव घेऊन पुन्हा नवी मुंबईत जाण्यास सांगितले. मात्र, याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. त्यानंतर, पालिकेचे आरोग्य पथक व पोलिसांनी तेथे जाऊन ४०० कर्मचा यांना त्याच ठिकाणी बंदिस्त केले. त्यानंतर, त्यांची त्याच ठिकाणी तपासणी केली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.


कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला.  नवी मुंबईच्या ज्या कंपनीमधून हे कर्मचारी ठाण्यात आले होते, त्यांची तपासणी केली असून हे सर्व कर्मचारी निगेटिव्ह असल्याचे ते म्हणाले. यामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.