माजी सैनिकाची ११ लाखांची फसवणूक


माजी सैनिकाची ११ लाखांची फसवणूक


कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



ठाणे :  


ठाणे शहरात सदनिका (घर) घेणाऱ्या माजी सैनिकाची ११ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट परिसरातील इमारतीत सदनिका खरेदी करण्यासाठी प्रारंभीची रक्कम अदा करूनही सदनिका नाही आणि सदनिकेचे कागदपत्रदेखील दिले नाहीत.याप्रकरणी,महेश आहुजा या इस्टेट एजंटसह तिघाजणांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार डिसेंबर २०१८ पासून जानेवारी २०१९  या कालावधीत  घडला.
हिरानंदानी इस्टेट भागात वास्तव्य करणारे आलोक पराशर ५६ याना त्याच परिसरातील इमारतीतील दिवाकर आणि पूर्णिमा गुप्ता दांपत्याची सदनिका ३ कोटी ६० लाखांना विक्रीसाठी असल्याची माहिती इस्टेट एजंट आहुजा याने दिली होती.त्यानुसार,पराशर यांनी आपल्या विवाहित मुलासाठी सदरची सदनिका खरेदी करण्याचे ठरवले त्यानुसार,पराशर यांनी बयाणा रक्कम तसेच,इतर कारणांसाठी धनादेशाने पूर्णिमा गुप्ता,इस्टेट एजंट आहुजा व आहुजा यांचा कर्मचारी इंतेख्वाब उस्मानी यांनी तब्बल ११ लाख स्वीकारूनही सदनिकेची कागदपत्रेदेखील दिली नाही.याबाबत विचारणा केली असता आहुजा याने शिवीगाळ करीत कार्यालयातून हाकलून दिले.तसेच,ठार मारण्याची धमकी देत उलट पराशर यांच्याच विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे कासारवडवली पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.





 


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image