बांधकाम अधिकृत करण्यासाठी बनावट स्वाक्षरी


उल्हासनगर :


उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या प्रक्रियेत संरचना अभियंत्याची खोटी स्वाक्षरी करून अर्ज सादर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा गैरप्रकार संबंधित अभियंत्याच्याच निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केलीआहे. या प्रकारामुळे उल्हासनगर महापालिकेच्या नियमानुकूल प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. उल्हासनगर शहरातील ८५५ अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणावर तोडगा म्हणून राज्य शासनाने शहरात पुन्हा एकदा नियानुकूल प्रक्रिया या राबवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षांत यासाठी महापालिका आयुक्तांना पदनिर्देशित अधिकारीम्हणून कार्यभार देण्यात आला. उल्हासनगर महापालिकेने एक संकेतस्थळ सुरू करून त्याद्वारे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते. यासंबंधीची प्रक्रिया या सुरू असताना महापालिकेकडून अधिकृतरीत्या नेमल्या गेलेल्या एका संरचना अभियंत्याची स्वाक्षरी आणि शिक्का चिटकावून ऑनलाइन प्रक्रिया येत बनावट अर्ज सादर केल्याचे उघडकीस आले आहे. विकास नेहते असे या अभियंत्याचे नाव असून त्यांच्या सहीचे तब्बल १४ कअर्ज सादर केल्याचे नेहते यांच्याच निदर्शनास आले आहे. सुरुवातीलाअर्ज इमांक १२२८,१२२९,१२४८ आणि १२९१ यामध्येकअर्जावर वास्तुविशारद म्हणन आपली सही आणि शिक्का संगणकीय पद्धतीने चिकटवण्यात आल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास केला असता असे १४ अर्ज असल्याचे आढळले. याचा धक्का बसल्याने त्यांनी तात्काळ पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. हे अर्ज पालिकेचे स्थायी समितीचे सभापती राजेश वधारिया यांनी आयोजित केलेल्या शिबिरात दाखल झाल्याची बाब समोर आली आहे.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image