स्थलांतर करणाऱ्या कामगारांची व्यवस्था
ठाणे
संचारबंदीच्या काळात अनेक बाहेरील राज्यातील नागरिक,कामगारा मुंबई तसेच ठाणे जिल्हा सोडून आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांनी ते जेथे असतील तेथेच थांबावे, त्यांना जिल्हा प्रशासन निवास, भोजन सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. सर्व कामगारांची निवास, भोजन व्यवस्था महानगरपालिका, नगरपालिका यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष ०२२-२५३०१७४०, अथवा जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे ०२२-२५३४५१३०.