वैतरणा घाटाचे बांधकाम व सुशोभिकरणासाठी 86 लाख 18 हजारांचा निधी मंजूर

 वैतरणा घाटाचे बांधकाम व सुशोभिकरणासाठी 86 लाख 18 हजारांचा निधी मंजूर



भिवंडी,


- ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांना झळाळी देण्याच्या दृष्टीकोनातून खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्याने शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा परिसराचा कायापालट होणार आहे. अशोका धबधबा परिसरातील वैतरणा घाटाचे बांधकाम व सुशोभिकरणासाठी 86 लाख 18 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील धबधब्यांमध्ये अशोका धबधबा हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. विहिगाव येथील या धबधब्याच्या परिसरातील कामांसाठी खासदार कपिल पाटील यांनी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन विभागाने 86 लाख 18 हजारांचा निधी मंजूर केला आहे. या धबधब्याच्या परिसरात वैतरणा घाटाचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या दृष्टिकोनातून परिसरात सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.


या कामासाठी नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी निधी प्रदान करण्याचे आदेश जारी केले आहेत. या कामामुळे अशोका धबधबा परिसराला नवी झळाळी मिळणार असून, पावसाळ्याच्या काळात पर्यटनात वाढ होईल, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.