"प्रभाग क्र. १२ मध्ये जागतिक महिला दिन निमित्त  "तुझी माझी जोडी, चल जिंकू पैठणी"

"प्रभाग क्र. १२ मध्ये जागतिक महिला दिन निमित्त  "तुझी माझी जोडी, चल जिंकू पैठणी"



ठाणे
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या नगरसेविका सौ. रुचिता राजेश मोरे आणि राजेश मोरे यांनी आयोजित केलेल्या "तुझी माझी जोडी, चल जिंकू पैठणी" या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, विधी व न्याय सेवा, शास्त्रीय गायन, पत्रकारिता, पोलीस सेवा, कला आणि उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नंदिनी नरेंद्र बेडेकर, श्रीमती सुनिता मनोहर फडके, श्रीमती नीला अविनाश कासखेडीकर, अ‍ॅड. सुनंदा सुभाष आदक, श्रीमती मानसी महेंद्र कदम, कुमारी चैताली किशोर शिंदे, श्रीमती प्रियांका प्रभाकर काते, श्रीमती अपर्णा कीर्तीकुमार भागवत, श्रीमती प्राजक्ता नरेश सुतार, श्रीमती जान्हवी जगदीश मोरे या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
समाजातील दिव्यांग, गतिमंद, अपंग मुले हा समाजाचाच एक भाग असतो.
आणि अशा मुलांना सांभाळणं आव्हानात्मक असते.
प्रत्येक कुटुंबात स्त्री ही केंद्रस्थानी असते. आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची जबाबदारी साभाळणं हे तिचं प्रथम कर्तव्य असतं. या कार्यक्रमांतर्गत प्रभागात राहणा-या दिव्यांग, गतिमंद आणि अपंग मुलांच्या मातां श्रीमती हर्षदा हेमंत जाधव, श्रीमती शारदा प्रकाश मोरे, श्रीमती वर्षा संतोष कुरकुंडे,श्रीमती श्रद्धा उदय मोरे, श्रीमती सुप्रिया जितेंद्र सितापराव, श्रीमती वासंती श्रीराम आंब्रे, श्रीमती अनिता विजय पवार यांचा सत्कार करण्यात आला.
"तुझी माझी जोडी, चल जिंकू पैठणी" कार्यक्रमात विजेत्या स्पर्धक श्वेता पेडणेकर, वर्षा पेडणेकर यांना मानाची पैठणी व सोन्याचे कानातले, ज्योती गोळे, वर्षा सोनकर यांना सोन्याची नथ आणि अपर्णा कापसे, अक्षता कापसे या जोडीस चांदीचे पैंजण देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला महापौर नरेश म्हस्के,,उप महापौर पल्लवी कदम, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेविका नंदिनी विचारे, महिला बालकल्याण सभापती जयश्री डेव्हिड, नगरसेविका सुखदा मोरे उपस्थित होत्या.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image