ठाण्यातील प्रशासकीय यंत्रणा तत्पर, १६ मजुरांची केली तात्काळ व्यवस्था
ठाणे
घोडबंदर रोड येथून काही लोक ३० मार्च रोजी चालत जात होते. त्यांची चौकशी केली असता ते अंधेरी मुंबई येथून बहाराइच , उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी १६ पुरुष मजूर पायी चालत जात असल्याचे समजले.येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना थांबवून त्यांना कासारवडवली वाहतूक उपशाखा येथे वाघबिळ पुला खाली सेफ डिस्टनसिंग मध्ये बसवून प्रथम त्यांची जेवणाची व्यवस्था केली
ठाणे महानगर पालिकेच्या साहाय्यक आयुक्त सौ. बाबर मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ त्यांचे संबंधित अधिकारी वाघ यांना पाठविले आणि त्या सर्व मजुरांची पुढील व्यवस्था ठाणे महानगर पालिका शाळा क्रमांक ५३ , पातलीपाडा घोडबंदर रोड ठाणे येथे केली आहे अशा तऱ्हेने ठाण्यातील सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणा मजुर आणि इतर गोरगरीब लोकांच्या जीवितरक्षणाकरिता सज्ज झाली असल्याचे दिसत आहे.