सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. तसेच या कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
कोर्टाच्या निर्णयानंतर आता सरकारने शेतकऱ्यांचं ऐकावं : जयंत पाटील
भाजप सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नव्हतं… आता तरी कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारने शेतकऱ्यांचं ऐकावं.. सरकारला आता कळलं असेल कायदा किती अडचणीचा आहे. आतातरी त्यात बदल करण्यासाठी काही भूमिका घ्यावी, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारनं संवेदनशील व्हावं, शेतकऱ्यांना न्याय द्यावा : सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार… केंद्र सरकारचा अत्याचार सहन करत शेतकरी न्याय मागतोय… असंवेदनशील सरकारकडून अनेकदा चर्चा होवूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय झाला नाही… सरकारनं संवेदनशील व्हायला हवं… चर्चेची मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केलं… आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला संधी… सर्वांशी चर्चा करावी… शेतकरी प्रश्नावर निर्णय घ्यावा, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय.