प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी 'ईडी'कडे मागितली तीन दिवसांची मुदत

 

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सक्तवसुली संचनलनालायच्या (ED) चौकशीला हजर राहण्यासाठी अधिकाऱ्याकडे वेळ मागितली आहे. तस पत्र त्यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, ईडी त्यांना वेळ देणार नसल्याचे समजते. ईडी त्यांना चौकशीसाठी तात्काळ हजर राहण्याबाबत समन्स बजावणार असल्याचे ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.