मानपाडा येथील कचरा प्रकिया प्रकल्पाला नागरिकांचा विरोध

 

ठाणे दि : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रभाग क्र ४ मध्ये होणाऱ्या कचरा प्रकिया प्रकल्पाला तेथील नागरिकांनी विरोध केला आहे.

 ठाण्यातील मानपाडा,मुल्ला बाग परिसरातील नीलकंठ हाईट्स समोरील महापालिकेच्या जागेवर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव केला होता यानंतर ही जागा पडून होती आता या जागेत ठाणे महापालिकेच्या वतीने कचरा प्रकिया प्रकल्प उभारण्यात येत आहे याबाबत कोणतीही पूर्व कल्पना नागरिकांना किंवा स्थानिक नगरसेवक यांना देण्यात आली नाही.स्थानिक नागरिकांनी याठिकाणी खोदकाम होत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्याकडे केल्यावर याठिकाणी पाहणी केली असता याठिकाणी कचरा प्रकिया प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले यावर नगरसेविका स्नेहा आंब्रे, भाजपाचे उपाध्यक्ष रमेश आंब्रे व स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. याठिकाणी सुरू असलेले काम थांबवले असून खोदण्यात आलेले खड्डे जेसीबीच्या साहाय्याने बजावण्यात आले.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये होणारा कचरा प्रक्रिया प्रकल्प भविष्यात त्रासदायक ठरणार आहे. सदर प्रकल्प हा भर वस्तीमध्ये होणार असल्यामुळे भविष्यात दुर्गंधी पसरून या प्रकल्पामुळे रोगराई वाढु शकते.त्यामुळे हा प्रकल्प रद्द करा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.