मुंबई पोलिसांनी रमेश अय्यर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने मुंबई पोलीस विरुद्ध ईडी असा सामना होण्याची शक्यता आहे.

मुंबई : ईडीकडून तपास केला जात असलेल्या टोप्स सेक्युरिटी प्रकरणातील तक्रारदार रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रमेश अय्यर यांच्यावर टॉप्स सिक्युरिटीमध्ये आर्थिक फसवणुकी संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश अय्यर यांच्या तक्रारीमुळेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. मात्र, आता मुंबई पोलिसांनी अय्यर यांच्यावरच गुन्हा दाखल केल्याने मुंबई पोलीस विरुद्ध ईडी असा सामना होण्याची शक्यता आहे. टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांनी रमेश अय्यर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. रमेश अय्यर यांनी आर्थिक घोटाळा केला ज्यामुळे टॉप्स कंपनीला मोठे नुकसान झाल्याचा आरोप नंदा यांनी केला. दरम्यान, रमेश अय्यर तीच व्यक्ती आहे ज्यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार असून त्यांचा मित्र अमित चांदोळेला अटक झाली.



 

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image