राऊतांचा खोचक टोला : आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे


भाजपचे बहुतेक नेते पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर भेट घेतली असता राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला.


पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमाला संबोधित करताना संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे. भाजपचे लोकही पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही मानू लागले आहेत. त्यामुळे मी पवारांना भेटून राज्यपालांना मार्गदर्शन करायला सांगणार आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.


दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटून वाढीव वीज बिलाबाबत तक्रार केली होती. हे वीज बिल कमी करण्याचं आणि दूधाचे दर निश्चित करण्याबाबतचं निवेदन राज यांनी राज्यपालांना दिलं होतं. तेव्हा राज्यपालांनी राज यांना पवारांना भेटण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपाल आणि राज यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता केली.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image