अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही मुंबई पोलिसांनी सांगितलंय.

 

मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळून आल्यानंतर राज्यात 22 डिसेंबरपासून रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात आलीय. विशेष म्हणजे ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत राहणार असून, त्यासाठी नियमावलीही जाहीर झालीय. नाइट कर्फ्यूदरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई आहे, पण संचाराला बंदी नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय.

नागरिक कामानिमित्त बाहेर पडू शकतात, कर्फ्यू हा सुरक्षा आणि आरोग्यासाठी असल्याचंही मुंबई पोलिसांनी सांगितलंय. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर निर्बंध लादण्यात आले आहेत. नाइट शिफ्टमधील व्यवसाय, करमणुकीशी संबंधित पब, रेस्टॉरंट्स, थिएटर 11 वाजता बंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे.