नवी मुंबई: नवी मुंबईतील विमानतळाच्या नामांतराचा वाद आगामी काळात चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेने या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर भाजपने लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी रेटली आहे. त्यामुळे ठाकरे की पाटील? या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत.
ठाकरे की पाटील?; नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन शिवसेना विरुद्ध भाजप