काँग्रेस प्रभारींसमोर नितीन राऊतांची नाराजी, वनकरांच्या उमेदवारीवरुन थोरातांवर अप्रत्यक्ष टीका

 

मुंबई : राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आलेला असतानाच आता राज्यातही वादाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्यासमोरच पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. आंबेडकरी चळवळीचे नेते अनिरुद्ध वांकर यांना विधानपरिषदेचे तिकीट देण्यावरुन उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका केल्याचे वृत्त आहे.