विषयच खोल! कल्याणमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्याचा शेजारच्यांशी वाद, भांडण मोडण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मध्यस्थी

 ठाणे : कल्याणमध्ये राहणारे आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूरे यांचे शेजाऱ्यांशी वाद झाल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय समाज कल्याण मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले कल्याणमध्ये दाखल झाले. ते दयाल बहादूरे यांच्या घरी पोहचले. त्यांनी बहादूरे यांच्याघरात न्यायनिवाडा सुरु केला. आरपीआयचे पदाधिकारी आणि पोलीस आमनेसामने आले.

कल्याणचे एसीपी अनिल पवार यांनी गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी केंद्रीय मंत्री आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. “दयाल बहादूरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात देण्यात आलेली तक्रार ही पोलिसांवर दबाव टाकून देण्यात आली आहे. आपण एका इमारतीत राहतो. त्यामुळे एकमेकांना संभाळून घेतले पाहिजे, असा सल्ला सोसायटीतील लोकांना दिली आहे . या प्रकरणात पोलिसांना उचीत कारवाई करण्यात यावी असी सूचना केली आहे”, असं आठवले म्हणाले (Ramdas Athawale meet RPI Workers at kalyan).

“एकाच सोसायटीत राहत असताना एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. एकमेकांचा अपमान करु नये. एकमेकांना टोमणे मारु नये. दयाल बहादूर हे आमच्या रिपब्लिक पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पत्नीला सोसायटीतील मंडळींकडून टोमणे मारल्याने वाद निर्माण झाला. सोसायटीतील मंडळींकडून दयाल बहादूरे यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत एसपींना चौकशीचे आदेश दिले आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

“दयाल बहादूरे यांच्या कुटुंबावर कोणतीही तक्रार होता कामा नये, अशी मी पोलिसांशी चर्चा केली आहे. त्यामुळे सर्व बिल्डिंगच्या लोकांना सांगणं आहे, एकमेकांचा आदर राखला पाहिजे. अनेक जाती-धर्माचे आपण एका बिल्डिंगमध्ये राहत आहोत. बिल्डिंग म्हणजे गावच आहे. जो काही प्रकार संबंधित मुलाने केलाय ते चुकीचे आहे. पोलिसांनी त्यावर कारवाई केलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की दयाल बहादूरे यांच्या कुटुंबियांवरोधात जी चुकीची तक्रार केली गेली आहे त्याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image