ठाणे दि : इंग्रजांना तब्बल 18 वेळा लढाईत हरवणारा व उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले,भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते,महायुद्धा,महापराक्रमी, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर प्रतिष्ठानच्या वतीने एसटी वाहक-चालक व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले.
यंदा कोरोनाचे सावट असल्याने महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा यांच्या वतीने व प्रतिष्ठानचे उपसचिव तुषार धायगुडे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील खोपट एसटी आगारातील एसटी चालक-वाहक व कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला एसटीचे ठाणे विभाग वाहतूक अधिकारी रमेश बांदल,खोपट आगार व्यवस्थापक प्रतिभा भांगरे,धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,उपसचिव तुषार धायगुडे,कार्यकारणी सदस्य सुरेश भांड,आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाच्या पार्शवभूमीवर एसटी चालक-वाहक व कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना मास्कचे वाटप केल्याबद्दल एसटीचे ठाणे विभाग वाहतूक अधिकारी रमेश बांदल यांनी संस्थेचे कौतुक केले.या कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची परवा न करता एसटी चालक-वाहक व कर्मचारी नागरिकांना सेवा देण्याचे काम करत आहेत.या दरम्यान कोरोनामुळे काही कर्मचार्यांना आपले प्राण देखील गमवावे लागले.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य असल्याच्या भावनेने प्रतिष्ठाच्या वतीने त्यांना मास्कचे वाटप केल्याचे कार्यक्रमाचे आयोजक व प्रतिष्ठानचे उपसचिव तुषार धायगुडे यांनी यावेळी सांगितले