ठाणे (प्रतिनिधी)- सामान्य नागरिकांना कोरोनाची लक्षणे जाणवत असली तरीही, कोविड चाचणीचे दर जास्त असल्याने अनेकजण तपासणी करीत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृह निर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शनिवार पासून मोफत कोविड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंब्रा- कौसा भागातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. कोरोनावर मात करण्यात मुंब्रावासियांना यश आले असले तरीही चाचण्या वाढविल्यास कोरोनाचा समूळ नाश करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या भागात मोफत कोविड चाचण्या करण्यात याव्यात, असे आदेश डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणेशहरााध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणी सय्यद अली (भाई साहब), राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, ऋता जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष तथा परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी दिली. शनिवारी (दि. 5) सकाळी 11 ते 3 आणि सोमवार (दि.7) ते शुक्रवार (दि.11) सकाळी 11 ते 4 या वेळेत मुंब्रा वासियांना मोफत कोरोना चाचणी करुन घेता येणार आहे, असेही खान यांनी सांगितले.या शिबिराच्या आयोजनामध्ये नगरसेवक शानू पठाण, राजन किणे, सिराज डोंगरे, अनिता किणे, अशरिन राऊत, हाफ़िजा नाईक, सुनीता सातपुते, बाबाजी पाटील, मोरेश्वर किणे, सौ फरज़ाना शेख, रूपाली गोटे, मा. नगरसेवक हिरा पाटील, रेहान पीतलवाला, इमरान सुरमे, ज़फर नोमानी, संगिता पालेकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप आदींचा मोठा सहभाग आहे.