मुंबईचा महापौर आपल्याशिवाय बसू शकत नाही, काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला इशारा?

 

मुंबई: आगामी काळात मुंबईचा महापौर काँग्रेसच्या मदतीशिवाय बसू शकत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी केले. अस्लम शेख यांचे हे विधान शिवसेनेसाठी अप्रत्यक्ष इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अस्लम शेख यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आगामी काळात काँग्रेसच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर बसू शकत नाही. येत्या काळात जिल्हानिहाय वॉर्ड ऑफिस कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मुंबईत काँग्रेसचा विस्तार झाला पाहिजे. अन्यथा मला पाच वर्षे मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही, असे अस्लम शेख यांनी म्हटले.

भाजप आणि शिवसेनेतील द्वंद्वामुळे मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेवर काही करून भगवा फडकावयचाच, असा निर्धार भाजपने व्यक्त केला होता. त्यानंतर शिवसेनेकडूनही स्थानिक नेत्यांना पालिका निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image