वसई: वसईच्या भुईगाव येथे एक स्विफ्ट कार समुद्रात बुडाल्याचा चक्रावणारा प्रकार समोर आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या दृष्टीस ही कार पडली. त्यानंतर आता ही कार समुद्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र, ही गाडी नेमकी कोणाची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.