हवी तेवढी घ्या आणि सुरक्षित घरी जा, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांकडून मद्यपींसाठी अनोखी सुविधा


 ठाणे : थर्टीफस्ट आणि राज्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत असलेली संचारबंदी यामुळे तळीरामचं आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र त्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी अनोखी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. हवी तेवढी घ्या…आणि सुरक्षित घरी जा.. असे या सुविधेचे नाव आहे. या सुविधेतंर्गत मद्यपींना वाहन आणि वाहन चालकाची सुविधा दिली जाणार आहे.

यंदा थर्टीफस्ट हा संचारबंदीच्या सावटाखाली असल्याने वेळेत दारु पिणे आणि घरी जाणे एवढेच आता मद्यपींच्या हातात आहे. आपल्या ग्राहकांनी सुरक्षित घरी जावे यासाठी घोडबंदर परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनी एक अभिनव सुविधा सुरु केली आहे. या हॉटेलमध्ये आलेल्या मद्यपींना मद्य घेऊन वाहन चालविण्याची गरज नाही. त्यांना सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी हॉटेल मालकाने वाहने आणि वाहन चालक तैनात केले आहेत. हॉटेलमध्ये हवी तेवढी घ्या…. अन् घरी अपघातविरहीत सुरक्षित जा” अशी संकल्पना यंदा राबविलेली आहे.