वारंवार सांगूनही फेरीवाले हटेना, आता केडीएमसीचा मोबिलीटी प्लान

 

ठाणे : “केडीएमसीत फूटपाथ आणि दुकानासमोर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांविरोधात महापालिकेने अनेकवेळा कारवाई केली. मात्र, या कारवाई पश्चातही दुकानदार ऐकत नसल्याने उद्यापासून त्यांना मोठा दंड आकारुन ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल”, असा इशारा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
“येत्या 15 दिवसात रस्त्यावरील अनावश्यक गतीरोधक हटविण्याची कारवाई सुरु केली जाईल. त्याचबरोबर सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांविरोधातही चलनची कारवाई केली जाईल”, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.