पहिल्या मोठ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास काहीसा उशीर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या या 6 जागांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपनं सर्वस्व पणाला लावलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होणारी निवडणूक यंदा पहिल्यांदाच एवढी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तानाट्यानंतर पार पडणाऱ्या या पहिल्या मोठ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.