शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडी नोटीस.


 मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला इडी नोटीस पाठवली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुणात किती ताकद आहे हे पाहूच असं ट्विट करत त्यांनी ईडीला आणि मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे आव्हानच दिलं आहे. मागील अनेक दिवसांपासून संजय राऊत यांनी उघडउघड भाजप आणि मोदी सरकारवर टीका केल्यानेच ही ईडीची नोटीस पाठवल्याचा आरोप शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय.