शेतकरी आंदोलनांचा मोर्चा आनंद नगर येथे दाखल

 

ठाणे : शेतकरी आंदोलनांचा मोर्चा ठाणे येथे आल्यावर ठाण्यातील आनंद नगर मुलुंड चेक नाका येथे विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आंदोलनकरी जत्थ्याचे स्वागत करण्यात आले. शेतकरी आंदोलनाला ठाण्यातील जनतेचा पाठींबा,  शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा व कामगार विरोधी 4 कोड रद्द करा. अंबानीच्या जिओ सीम वर बहिष्कार घाला.अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. सुमारे 70 गाड्यातून आलेला शेतकरी मोर्चा प्रतिभा शिंदे व किशोर धमाले यांच्या   नेतृत्वाखालील आला होता. यावेळी आंदोलनांची संघर्ष समिती, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, स्वराज अभियान, म्युनिसिपल लेबर युनियन, बाल्मिकी विकास संघ, शोषित जन आंदोलन, लोकराज संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आदी विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विश्वास उटगी, जगदीश खैरालिया, डाॅ संजय मंगला गोपाळ, सुब्रतो भट्टाचार्य, वंदना शिंदे, मुक्ता श्रीवास्तव, बिरपाल भाल, गिरीश भावे, गिरीश साळगावकार, नरेश भगवाने जगदीश खैरालिया सहित ठाण्यातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.शेतकरी आंदोलनांचा मोर्चा मूळे ठाण्यातील आनंद नगर मुलुंड चेक नाका येथे मुंबई ला जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली.