ई चलानची विक्रमी दंड वसूली,
२७ दिवसांत २ कोटी ८० लाखांचा भरणा
ड्रिंक अँण्ड ड्राईव्ह मोहिमेतही होणार वसूली
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात बजावलेल्या ई चलानच्या दंडवसुलीसाठी ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या २८ दिवसांत २ कोटी ९३ लाखांचा भरणा वाहनचालकांनी केला आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात असून तिथल्या तपासणीत वाहनचालकांकडून थकित दंड वसूल केला जात आहे. या पद्धतीने होणारी कारवाई टाळण्यासाठी संबंधित वाहनचालकांनी आपापल्या दंडाची थकीत रक्कम भरावी.
१४ फेब्रुवारी, २०१९ पासून ठाणे वाहतूक पोलिस आपल्या १८ वाहतूक उपविभागामार्फत ई चलान प्रक्रिया राबवत आहेत. आजवर सुमारे २६ कोटींपेक्षा जास्त दंड त्यातून ठोठावण्यात आला आहे. परंतु, वाहनचालकांकडून या दंडाच्या रकमेचा भरणा होत नसल्याने त्या विरोधात वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी १ डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीला या मोहिमेअंतर्गत प्रतिदिन दोन ते सव्वा दोन लाख रुपयांचा दंड वसूल केला जात होता. ती रक्कम आता सरासरी १० ते ११ लाखांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांपासून मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेतील तपासणीदरम्यान ई चलानची थकबाकी आढळल्यास ती वसूल केली जात आहे. अशा पद्धतीची अप्रिय कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी स्वतः थकीत दंडाची रक्कम भरून सहकार्य करावे. आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे, याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली आहे. ती भऱण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

वाहनांच्या टोईंग कारवाईचा दंड वाढणार
टोईंग व्हँनच्या माध्यमातून नो पार्किंगमध्ये उभ्या केल्या जाणा-या वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईत वाहनांच्या टोईंग करण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत गेल्या १० वर्षांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दंडात्मक कारवाईसाठी होणाऱ्या खर्चातही वाढ होत असून त्यातून जमा होणाऱ्या महसुलावर जीएसटीचाही भरणा करावा लागतो. त्यामुळे ही दंडात्मक रक्कम वाढविण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिस विभागाने घेतला आहे. मात्र, ही रक्कम मुंबई आणि पुणे शहरांत आकारल्या जाणाऱ्या दंडापेक्षा कमी असेल.
वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने पोलिसांनी नेमलेल्या टोईंग व्हँनच्या माध्यमातून टो करून रस्ता मोकळा केला जातो. दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या टोइंग साठी जि एस टी सह अधिकचे रुपये आकारले जाणार आहेत. मुंबई आणि पुण्यात वाहनांच्या टोईंगचे दर हे ठाणे शहरापेक्षा खूप जास्त आहेत. ठाण्यातील टोईंगच्या दरांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. टोईंगच्या कारवाईला शिस्त लावण्यासाठी जे करार केले जाणार आहेत, त्यात अनेक अटी-शर्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे खर्चातही वाढ होणार आहे. त्यामुळे टोईंग दंडात केलेली वाढ सयुक्तिक असल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी नियमानुसार वाहने पार्क करावी, असे आवाहन उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

ड्रिंक अँड ड्राइव्ह - सहप्रवाशांवरही होणार कारवाई
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांचा ‘अलर्ट’ मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी २५ डिसेंबरपासून कारवाई सुरू केली आहे. पहिल्या चार दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये सुमारे ४१५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरसह ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारून प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. यंदा त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
कोरोना संक्रमणाचा धोका असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून वाहतूक पोलिस मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करत नव्हते. ब्रेथ एनलाइजरच्या सहाय्याने तपासणी शक्य नसल्याने मद्यपी वाहनचालकांचा बेदरकारपणा वाढू लागला आहे. रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत त्यामुळे वाढ होण्याचा धोका आहे. ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू असल्याने हाँटेल, बार आणि अन्य ठिकाणी रात्री ११ नंतर पार्ट्यांवर बंदी आहे. परंतु, अनेकजण आपापल्या घरांमध्ये किंवा खासगी ठिकाणांवर पार्टी केल्यानंतर नववर्ष स्वागताचा जल्लोष करण्यासाठी बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे होणारे संभाव्य अपघात आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांची मद्यपी वाहनचालकांच्या विरोधातील कारवाई तीव्र करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायदा, १९८८च्या कलम १८५ अन्वये मद्यपी वाहनचालकांना दोन हजार रुपये दंड किंवा सहा महिने कैद अशी शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा पुन्हा-पुन्हा केल्यास तीन हजार रुपये दंड आणि दोन वर्षे कारावास अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. तसेच, याच कायद्याच्या कलम १८८ मध्ये मद्य प्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास उद्युक्त केल्याचा ठपका ठेवत सहप्रवाशांवरही कारवाई होऊ शकते. त्या कलमाचा आधार यंदा पोलिस घेणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मद्य प्राशन करून वाहन चालवू नये किंवा मद्यपी वाहनचालकासोबत प्रवास करू नये, असे आवाहन उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. रात्री ११ नंतर घराबाहेर पडल्यास संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. नववर्षात अशी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी रात्री कुणीही घराबाहेर पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
…तर कुटुंबियांना फोन
पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये मद्यपी वाहनचालक आढळले तर त्यांच्या घरी फोन करून कुटुंबियांना कारवाईबाबतची माहिती देण्याचा विचार वाहतूक पोलिस करत आहेत. तरुण वाहनचालकांच्या विरोधात अशी कारवाई प्राधान्याने केली जाईल. प्रसंगी कुटुंबियांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्याबाबतचा विचारही सुरू आहे.
बारमालकांनी खबरदारी घ्यावी
मद्यपी वाहनचालकांना रोखण्यासाठी हाँटेल आणि बारमालकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना वाहतूक पोलिसांतर्फे दिल्या जाणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मद्य पिण्याचा परवाना नसलेल्या ग्राहकांना मद्य पुरवू नये. दारू न पिणारा ड्रायव्हर आहे, याची खारतजमा करूनच वाहन मालक आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांना मद्य द्यावे. ग्राहक दारू प्यायला असेल, तर त्याला वाहन चालवण्यास प्रतिबंध करावा. वेळप्रसंगी त्यांना रिक्षा-टॅक्सी आदी वाहनांची व्यवस्था करून द्यावी. शक्य असल्यास त्यांच्या गाडीसाठी पर्यायी ड्रायव्हर उपलब्ध करून द्यावा, असे त्यांना सांगितले जाणार आहे.