योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण


नाशिक : “राज्यातल्या गुंतवणुका बाहेर घेऊन जाण्याचा कट रचला जात असल्याची सरकार ओरड करत आहे. मात्र, या देशातील कुठल्याही व्यक्तीला आपल्या भागात उद्योग उभा राहावा यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे,” असे म्हणत भाजप नेते माधव भांडारी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची पाठराखण केली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका केली.