मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासाठी 9 डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी

 

मुंबई : मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या घटनापीठाकडे तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 9 डिसेंबरला दुपारी 2 वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.