27 गावांची नगरपरिषद झाली पाहिजे होती. पण 27 पैकी 9 गावे राजकीय फायद्यासाठी महापालिकेत घेतली गेली - भाजपा आमदार गणपत गायकवाड

 

ठाणे : राज्य सरकारचा कल्याण डोंबिवलीतील १८ गावांच्या स्वतंत्र नगर परिषदेचा निर्णय उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मनसे पाठोपाठ भाजप अमदाराने देखील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. “27 गावांची नगरपरिषद झाली पाहिजे होती. पण 27 पैकी 9 गावे राजकीय फायद्यासाठी महापालिकेत घेतली गेली. त्यांनी 9 गावे महापालिकेत ठेवून त्यांच्या सोयीप्रमाणे केलं आहे. यामागे बिल्डर लॉबीचा हात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जात आहे”, असा घणाघात आमदार गणपत गायकवाड यांनी केला.

“27 गावांची वेगळी नगरपरिषद बनवायची होती. ही नगरपरिषद झाली तर शेतकरी बांधवांचा एफएसआयचा जो विषय आहे, टीडीआर नगरपरिषदेत कमी भेटेल तर महापालिकेत जास्त भेटेल. तरीसुद्धा वेगळी नगरपरिषद असावी, अशी लोकांची भावना होती. त्यामुळे आम्ही नगरपरिषदेसाठी तयार होतो. पण 27 गावातील 9 गावे जेव्हा बाहेर निघाले त्यावेळी राजकीय घोषणाबाजी करणाऱ्या कोणत्याच नेत्याने आवाज उठवला नाही”, असं गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) म्हणाले.

“खरंतर 27 गावांची नगरपरिषद बनवायची होती. मात्र, त्यातील 9 गावे महापालिकेत ठेवली. याचा अर्थ आपल्या सोयीनुसार हे सर्व कामे करण्यात आले आहेत. यामागे मोठ्या बिल्डरलॉबीचा हात असण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींमध्ये सर्वसामान्य जनतेची दिशाभूल होते. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो”, अशी भूमिका गणपत गायकवाड यांनी मांडली.

“राज्य सरकारने या प्रकरणात घाई केली आहे. 27 गावांची नगरपरिषद बनवायची होती. मात्र, त्यातील नऊ गावे काढली. याचा काहीच ताळमेळ जमत नाही. राज्य सरकारने घाई करुन चुकीचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोयीप्रमाणे महापालिका आणि नगरपरिषदेची रचना केली जात आहे. हे चुकीचं आहे”, असं मत त्यांनी मांडलं.


Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image