सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता, 15 डिसेंबरनंतर लोकल सुरु करण्याचा सरकारचा विचार

 

दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये लोकांचा गावी प्रवास झाला. मोठ्या प्रमाणात गाठीभेटी झाल्या. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल, असं सांगण्यात आलं होतं.

त्यानुसार अजून दोन आठवडे कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णांच्या संख्येवर लक्ष दिलं जाणार आहे. त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अजून काही दिवस संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल. त्यानंतर 15 डिसेंबरच्या पुढे लोकलबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती चहल यांनी दिली आहे.