मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करतील. याशिवाय, मुख्यमंत्री दोन्ही जिल्ह्यातील इतर महामार्गाच्या कामांचाही आढावा घेतील. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देतील.