शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिना निमित्त नेत्र तपासणी शिबीर ७ दिवस
• मनजीतसिंग
ठाणे : महागिरी शिवसेना शाखा व ईशा नेत्रालय तर्फ़े हिंदुदृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सलग सात दिवस करण्यात आले आहे. उदघाटन प्रसंगी उपमहापौर सौ पल्लवी कदम,ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार,नगरसेवक सुधीर कोकाटे,विभागप्रमुख कमलेश श्रीश्रीमाल,शाखाप्रमुख नितीन ढमाले, दीपक मानकामे आदी उपस्थित होते. शिबिराचे आयोजन शाखाप्रमुख सचिन चव्हाण यांनी केले.