मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक


दुबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 57 धावांनी मात करत आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मुंबईची अंतिम फेरीत पोहचण्याची ही सहावी वेळ ठरली. मुंबईने दिल्लीला विजयासाठी 201 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मार्कस स्टोयनिसने 65 तर अक्षर पटेलने 42 धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.