नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.


नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळातही मार्केटमध्ये ग्राहक नसल्याने भाज्यांचा मालाला उठाव  कमी झाला आहे. त्यामुळे भाजीपाला मार्केटमधील भावात 50 टक्के घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे कोबी 10 रुपये, कोथिंबीर 6 रुपये, काकडी 6 रुपये, टोमॅटो 15 रुपये तर दुधी 12 रुपये किलोने विकला जात आहे. 


मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 622 गाड्यांची आवक झाली आहे. मात्र तरीही भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरूच आहे. सणासुदीच्या वेळी मार्केटमध्ये ग्राहक दिसत नाहीत. त्यामुळे भाजीचा उठाव होत नाही. याच कारणामुळे भाजीपाल्याच्या भावात 50 टक्के घसरण पाहायला मिळत आहे.


सध्या एपीएमसी मार्केटमध्ये 600 हून अधिक गाड्यांची आवक झाली आहे. मात्र सण असूनही मार्केटमध्ये 40 टक्के माल शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे.


तर सध्या बाजारात फ्लॉवर 8 ते 10 रुपये, कोबी 8 ते 12 रुपये, मिरची 20 ते 30 रुपये, काकडी 6 ते 10 रुपये किलो विकली जात असून, टोमॅटो 15 ते 20 रुपये, वांगी 15 ते 20 रुपये तर कोथिंबीर 5 ते 10 रुपये, मेथी 10 ते 15 रुपये, पालक 5 ते 10 रुपये दराने विकली जात आहे.