दुबई : आयपीएलमधील विजयासह मुंबई इंडियन्स संघाने पाचव्यांदा आयपीएल चषकावर स्वतःचं नाव कोरलं. अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. या विजयामुळे आयपीएलकडून विजेत्या मुंबईच्या संघाला आयपीएलच चषक आणि 20 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. तसेच उपविजेत्या दिल्लीच्या संघाला 12.5 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांना (सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर) 8 कोटींहून अधिक रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे.
IPL 2020: विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल