मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तपदी अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. चहल यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली, तेव्हा ते प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी होते. आता त्यांना अपर मुख्य सचिव श्रेणीत स्थानापन्न पदोन्नती देण्यात येत आहे.
आयुक्तपदी रुजू होऊन उद्या त्यांना सहा महिने पूर्ण होत आहेत. इक्बाल चहल यांनी 8 मे 2020 रोजी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी चहल हे प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे प्रधान सचिव (जलसंपदा) या पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता.