दहिसर येथील उद्यानास 'माता रमाई भीमराव आंबेडकर मैदान' असे नाव देण्यात आले.


दहिसर :  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेल्फेअर एसोसिएशन, आम्रपाली महिला मंडळ आणि बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक 553, दहिसर यांच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेविका मा. शीतल म्हात्रे, शिक्षण व विधी समिती सदस्य यांच्या प्रयत्नाने दहिसर येथील उद्यानास 'माता रमाई भीमराव आंबेडकर मैदान' असे नाव देण्यात आले. या नावाच्या नामकरण फलकाचे उद्घाटन  8 नोव्हेंबर 2020 रोजी माननीय आनंदराज आंबेडकर सरसेनानी, रिपब्लिकन सेना आणि आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे शिवसेना महिला संघटक सुजाता शिंगाडे, साहेबराव गडकरी, विद्यानाथ रोकडे, सचिन श्रीधर कांबळे, प्रकाश कांबळे, विशाल श्रीधर कांबळे, दिपक कांबळे, सुनिल साळिस्तेकर, जयप्रकाश गावंडे, सुभाष पवार, बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.  553 चे गटप्रतिनीधी गजानन तांबे, विजयकुमार लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याच सोहळ्यामध्ये ज.वी. पवार साहेबांनी लिहलेले पुस्तक बाबांची रामू या पुस्तकाची प्रत त्यांनाना भेट देण्यात आली.