मुंब्रा- कौसा भागातील 69 शाळांमध्ये तीन महिन्यांचे शुल्क माफ


ठाणे (प्रतिनिधी)- लॉकडाऊनच्या काळात पालकांचे आर्थिक स्त्रोत खंडीत झाल्यामुळे शाळांचे शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात येत होती. यावर तोडगा काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार मुंब्रा कौसा एज्युकेशन फी सॉल्युशन कमिटी स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे सुमारे 69 शाळांनी तीन महिन्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्राध्यक्ष तथा परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.


विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक विवंचनेत असल्याने शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात होती. त्यामुळे डॉ. आव्हाड यांनी ही समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली  ऋता जितेंद्र आव्हाड, सयद अली अशरफ(भाई साहब)  शमीम खान, अशरफ शानू पठाण, शादाब खान, रफिक कामदार यांची मुंब्रा कौसा एज्युकेशन फी सॉल्युशन कमिटी स्थापन करण्यात आली. या सर्व सदस्यांनी शाळा-कॉलेजांना भेटी देऊन शुल्क माफ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, सुमारे 69 शाळांनी तीन महिन्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच इतर शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे.दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कार्यालय तसेच संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी शिबिराचेही आयोजन केले होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना  प्री मेट्रिक स्कॉलरशिप, पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुमारे 9 हजार 182 विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 7 हजार 146 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. तसेच,  अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिपदेखील सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती शमीम खान यांनी दिली.  


यावेळी  सयद अली अशरफ, श्रीमती अशरीन राउत,  राजन किणे,  सिराज डोंगरे,  अनिता किणे,   हाफ़िजा नाईक,  सुनीता सातपुते,    हीरा पाटील,   ी बाबाजी पाटील,  रेहान पीतलवाला,   इमरान सुरमे,  ज़फर नोमानी,   मोरेश्वर किणे, श्रीमती फरज़ाना शेख,  रूपाली गोटे,  संगिता पालेकर, मुफ्ती अशरफ सहाब,   शोएब खान,  शादाब खान,   मुन्ना चौगले,  पल्लवी जगताप,  मुम्ताज़ शाह, श्री इम्तियाज़ खान उर्दु,    बबलू शेमना,  जावेद शेख,  सकिब् दाते,, श्री  मेह्सर् शेख,  अयज़् बबलू,  पुजा खान,  मिनाज़ आपा,   इम्तियाज़ वनू,    इशरत शेख,   न्हन्ने भाई,   रफी मुल्ला, अतीक खांचे,  सरफराज़ काज़ी,  अहद शेख,  सलीम सर,  ी इमरान खान,  ी अलतमश शेख,   सलीम शेख, मोइज़ शेख आदी उपस्थित होते.