शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.


मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यांपासून थकलेला आहे. या तिन्ही महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन हे दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. यासाठी शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर यावर मार्ग काढण्यात आला आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.


यानुसार शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.


टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे 3 हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली.


या कारणामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून ही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे असल्याचेही अनिल परब यांनी सांगितले.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image