गेल्या वर्षीपेक्षा 4600 रुपये अधिक बोनस : BMC पाठोपाठ BEST कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड


मुंबई : ‘बेस्ट’ (BEST) कर्मचाऱ्यांची दिवाळीही आता गोड होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्टच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्या साठी बोनस ची घोषणा केली आहे. ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना दहा हजार शंभर रुपयांचा बोनस मिळणार आहे.


बृहन्मुंबई महापालिकेकडून दोन दिवसांपूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर झाला. त्यानंतर ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनीही बोनससाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार 100 रुपये इतके सानुग्रह अनुदान जाहीर केले.




बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बेस्टमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तीन नोव्हेंबर 2020 रोजी वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत बेस्टच्या कर्मचारी युनियनसोबत सकारात्मक चर्चा झाली होती.




Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image