मुंबई: कोरोना संकटाच्या काळात ‘बेस्ट’च्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचार्यांना रोज 225 रुपये भोजनभत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे. मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी. महामंडळाच्या सुमारे 1 हजार बस बेस्टच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. त्यासाठी राज्यभरातील एस.टी. महामंडळाचे साडे चार हजार कर्मचारी मुंबईत बेस्टची सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांना आता रोज 225 रुपये भोजनभत्ता दिला जाणार आहे.