रेल्वेची बडी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, SEBI कडे कागदपत्रे जमा

आता भारतीय रेल्वेची आणखी एक कंपनी रेल्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(RailTel) IPO आणण्याच्या तयारीत आहे.






नवी दिल्लीः गेल्या वर्षीच बाजारात IRCTCचा आयपीओ आला होता. ज्याने गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले. आता भारतीय रेल्वेची आणखी एक कंपनी रेल्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(RailTel) IPO आणण्याच्या तयारीत आहे. रेलटेल कंपनीनं आयपीओ आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी RailTel मार्केट रेग्युलेटरी असलेल्या सेबी (SEBI)कडे कागदपत्रं जमा करणार आहे. (railtel corporation ipo coming soon)


सेबीच्या परवानगीनंतर RailTel कंपनी आयपीओ आणण्याच्या तारखेची घोषणा करेल. या IPOद्वारे रेलटेल या रेल्वे कंपनीने एकूण 700 कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या IPOअंतर्गत सेबीकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार सरकार कंपनीतील 8.66 कोटी शेअर्सची विक्री करण्याची ऑफर देणार आहे. रेलटेल ही भारत सरकारची एक कंपनी आहे. ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा पुरवणारी कंपनी आहे आणि तिची स्वतंत्र संप्रेषणाची पायाभूत सुविधा आहे. रेलटेल दूरसंचार नेटवर्क आणि पायाभूत सुविधा सेवा, व्यवस्थापित डेटा सेंटर आणि होस्टिंग सेवा, सरकारी आणि गैर-सरकारी ग्राहकांना सेवा प्रदान करते.



आयसीआयसीआय सिक्युरिटीज,आयडीबीआय कॅपिटल, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड यांना या IPOसाठी व्यापारी बँकर केले गेले आहेत. डिसेंबर 2018मध्ये रेलटेलमधील 25 टक्के हिस्सा विकण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. आयआरसीटीसीच्या बंपर लिस्टिंगनंतर पुन्हा गुंतवणूकदारांना पैसे मिळवण्याची मोठी संधी मिळेल आणि या आयपीओचा बाजारात प्रवेश हा दणका ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कंपनीने आयपीओमध्ये फक्त 320 रुपयांच्या इश्यू प्राइजमध्ये शेअर्स जारी केले होते.


महत्त्वाचे म्हणजे आयपीओसाठी सन 2020 हे वर्ष अधिक चांगले होते. गेल्या महिन्यात अनेक कंपन्यांचे आयपीओ सुरू झाले आहेत. गुंतवणूकदार आता रेलटेलच्या आयपीओची प्रतीक्षा करत आहेत. 30 जूनपर्यंत, ऑप्टिक फायबर नेटवर्क टाकण्यासाठी रेलटेलने देशातील विविध शहरांमध्ये 55,000 किमी आणि 5,677 रेल्वे स्थानके व्यापली आहेत.