खाजगी रुग्णालयांचा हैदोस, एकीकडे रिपोर्ट पॉझिटिव्ह दुसरीकडे निघेटीव्ह




 नागरिकांच्या जीवाशी खेळ,एकीकडे रिपोर्ट पॉझिटिव्ह दुसरीकडे निघेटीव्ह

ठाणे

 

कोरोनाचा अहवाल एका खासगी लॅबमध्ये मध्ये पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या खाजगी लॅब व हॉस्पिटलमध्ये निगेटीव्ह असा आला असून हा नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू असल्याचा आरोप धनगर समाजाचे जेष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे यांनी केला आहे.
हा सर्व प्रकार स्वतः जयसिंग तात्या शेंडगे यांच्या संदर्भात घडला आहे. शेंडगे यांना पोटाचा आजार असल्याने त्यांना डॉक्टरने तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले  त्यानुसार डॉक्टरांनी पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना कोविड चाचणी करण्यास सांगण्यात आले त्यानुसार त्यांनी मुलुंड येथील आरती डायग्नोस्टिक सेंटर मधून २२ जुलै रोजी कोविड चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली परंतु जयसिंग शेंडगे यांना कोणताही त्रास नसल्याने त्यांना या चाचणी बाबत शंका निर्माण झाली त्यामुळे शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांनी ठाण्यातील वैद्य लॅब मधून २४ जुलै रोजी पुन्हा कोव्हिडची चाचणी केली याठिकाणी चाचणी निघेटीव्ह आली.

या सर्व घटनेमुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला त्यामुळे शेंडगे यांनी त्यांचा वैद्यकीय उपचार करणाऱ्या ज्युपिटर हॉस्पिटलशी संपर्क करून याबाबत त्यांना कल्पना दिली.यावेळी ज्युपिटर हॉस्पिटलने खबरदारी म्हणून जयसिंग तात्या शेंडगे यांची उपचाराआधी  २६ जुलै रोजी कोविड चाचणी केली याठिकाणी देखील चाचणी निघेटीव्ह आल्याने मुलुंड येथील आरती डायग्नोस्टिक सेंटर मध्ये केलेल्या कोविड चाचणी रिपोर्ट चुकीचा असल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असताना देखील सरकार याकडे दुर्लक्ष का करते याबाबत प्रश्न चिन्ह उभे राहत आहे. नागरिक आधीच या कोरोनामुळे भयभीत असताना अशाप्रकारे कोविड पॉझिटिव्ह असा चुकीचे रिपोर्ट देऊन नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या आरती डायग्नोस्टिक सेंटरची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी श्री शेंडगे यांनी केली आहे.