बाजार भावापेक्षा दुप्पट भावाने इंजेक्शन विकणाऱ्याना मिरारोड पोलिसांनी रंगेहात पकडले

बाजार भावापेक्षा दुप्पट भावाने इंजेक्शन विकणाऱ्याना मिरारोड पोलिसांनी रंगेहात पकडले


मिरारोड


कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जर एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल तर रुग्णालयातून विविध इंजेक्शन आणि गोळ्यांची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडे केली जाते. त्यामध्ये रेमडीसिवर १०० एमजी या इंजेक्शनचाही समावेश आहे. हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध आहे.  या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. बाजार भावापेक्षा दुप्पट भावाने हे इंजेक्शन विकणाऱ्या दोन व्यक्तींना मिरारोड पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या दोन आरोपींकडून 21 हजार 600 रुपये किंमतीची ४ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.





शुक्रवारी(१० जुलै) सायंकाळी मिरारोड पूर्व भागातील साईबाबानगर येथे दोन व्यक्ती रेमडीसिवर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिरारोड पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, मिरारोड पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्याने सापळा रचला. या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एका इंजेक्शनची 5 हजार 400 रुपये किंमत असलेली एकूण 21 हजार 600 रुपये किंमतीची ४ इंजेक्शन जप्त करण्यात आली. सपना घुणकीकर यांच्या तक्रारीवरून विविध कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कदम करत आहे.


 






 



 






 




 



Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना आव्हान
Image
कचरावाहक घंटा गाडीमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी केडीएमसीच्या एका कंत्राटी घंटागाडी चालकाला अटक करण्यात आली आहे.
Image