कोरोनाबाधित कुटुंब रुग्णालयात, घरातून दोन लाखाचे दागीने चोरीला

कोरोनाबाधित कुटुंब रुग्णालयात, घरातून दोन लाखाचे दागीने चोरीला


ठाणे


तीन हात नाका येथील  गुरूद्वारा येथील भांजेवाडी परिसरात कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या एका महिलेच्या घरात चोरी झाली. ३ जुलैला त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांचे घर कुलूपबंद होते. बुधवारी सकाळी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना दिसले. याची माहिती महिलेला मिळाल्यानंतर तिने नातेवाईकांना घराची तपासणी करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्या घरातील १ लाख ८९ हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याची बाब समोर आली. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. महिला आणि तिच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाल्याने गेल्या दोन आठवडय़ांपासून त्यांचे घर बंद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.