रिक्षा-टँक्सी चालकांसह हाय-वेवरच उपोषणाला बसणार

रिक्षा-टँक्सी चालकांसह हाय-वेवरच उपोषणाला बसणार
जितेंद्रकुमार इंदिसे यांचा इशारा



 ठाणे 


लॉकडाऊनमुळे रिक्षा- टँक्सी चालकाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.  पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे आता रिक्षाचालकांच्या व टँक्सी चालकांच्या कुटंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे सर्व हप्ते माफ करावेत आणि रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी; अन्यथा, रिक्षाचालकांसह आम्ही पूर्व द्रूतगती महामार्गावरच उपोषणाला बसू, असा इशारा रिपाइं एकतावादीचे नेते तथा टँक्सी - रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे यांनी दिला आहे.
  लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणारा रिक्षा - टँक्सी  चालक चांगलाच होरपळून निघाला आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून त्याची रोजीरोटी बंद झाली आहे.त्याची रोजची परिस्थिती म्हणजे रोज कमवील तरच रोज खाईल अशी आहे.आणि येणारा पुढील काळ किती दिवस,वेळ खाईल याचा कोणताही अंदाज लावता येत नाही.  त्यामुळे रोजंदारीवर व्यवसाय करणारा रिक्षा चालक हतबल झाला आहे.त्याच्यापुढे आर्थिक संकट उभे राहीले आहे.बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.  प्रत्येक रिक्षा चालकांचे कमीतकमी चार ते पाच जणांचे कुटूंब आहे.त्यांची सध्या उपासमार होत आहे.आर्थिक कोंडी झाली आहे.त्यामुळे रिक्षा-टँक्सी  चालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत तातडीने जाहीर  करावी; त्यांचे रिक्षाचे हप्ते रद्द करावेत आणि रिक्षा चालविण्यासाठी तत्काळ परवानगी द्यावी; अन्यथा, ठाण्यातील सर्व टँक्सी - रिक्षाचालक हाय-वेवरच उपोषणाला बसतील, असा इशारा जितेंद्रकुमार इंदिसे यांनी दिला आहे.