महापालिका आयुक्तांची आपत्कालीन कक्षास भेट

महापालिका आयुक्तांची आपत्कालीन कक्षास भेट
 
ठाणे 


महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज महापालिकेच्या प्रादेशिक आपत्कालीन कक्षाला भेट देवून त्या ठिकाणी कशा प्रकारे काम चालते याची माहिती घेतली. दरम्यान हवामान खात्याने येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
      मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आपत्कालीन कक्षास भेट देवून सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम आदी उपस्थित होते.