श्री माँ वनस्थळी आश्रमातर्फे भगवत गीतेच्या अध्ययनाची सुवर्णसंधी
ठाणे
श्री माँ ट्रस्ट वनस्थळी आश्रम, पातलीपाडा, ठाणे पश्चिम यांच्या वतीने श्री तारा माँ यांच्या आशीर्वादाने भागवत गीतेचे अभ्यासक श्री बालगोपाल यांच्या मार्गदर्शनाखालीयु ट्यूबवर अठरा अध्यायांचा भागवत गीतेचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम यु ट्यूब वर प्रसारित होणार आहे. दैनंदिन पाच श्लोक या प्रमाणे शब्दफोड करून सोप्या उच्चारासह सार्थ भगवत गीता शिकवली जाणार आहे. या प्रबोधपर व्याख्यानाचा मनशांती साठी तरुण अभ्यासक, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.