ठाणे महापालिका क्षेत्रात उपचार घेणाऱ्यांची संख्या ५ हजार २
ठाणे
६ जुलै रोजी संध्याकाळपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ५ हजार २ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ५८१ कोरोना रूग्ण बरे झाले तर ४१६ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५ हजार ३२३ रूग्ण उपचार घेत असून ४ हजार ३२ बरे झाले तर १४४ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ११९ रूग्ण असून ४ हजार ५८६ बरे झाले तर २५२ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार २३४ रूग्ण उपचार घेत असून ३ हजार ७१ कोरोनातून बरे झाले तर १६६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये १ हजार ५६६ रूग्ण असून १ हजार ३४६ बरे झाले तर ५७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १ हजार ८८ रूग्ण उपचार घेत असून १ हजार १९९ कोरोनातून बरे झाले तर १२० जणं दगावले. अंबरनाथमध्ये ५६८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून १ हजार ६०९ बरे झाले तर ७५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ५२५ रूग्ण असून ४६९ कोरोनामुक्त झाले तर १७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ४१६ रूग्ण असून ८८४ बरे झाले तर ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १९ हजार ८४१ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत १ हजार ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ हजार ७७७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण ४४ हजार ९२६ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत.